भारतीय संघाने केले हे ५ विक्रम

-भारतीय संघाचा टी२० मधील हा ५० वा विजय आहे. यापूर्वी पाकिस्तान(६९), दक्षिण आफ्रिका(५७) आणि श्रीलंका (५१) या संघांनी ५० किंवा त्यापेक्षा जास्त विजय टी२० सामन्यात मिळवले आहेत.

-भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलग ७ टी२० सामने जिंकले आहेत. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा पराभव २०१२ मध्ये झाला होता.

-विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२०मधील शेवटच्या ५ खेळी अशा- ९०*, ५९*, ५०, ८२*, २२*

-भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया आजपर्यंत १४ टी२० सामने खेळला असून त्यात ८ सामन्यात वेगवेगळ्या कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. तर भारताकडून १४ सामन्यात विराट केवळ दुसरा कर्णधार आहे.

युझवेन्द्र चहलने सलग ४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ४वेळा ग्लेन मॅक्सवेलला बाद केले आहे. त्यात पहिल्या तीन वनडे सामन्यांचा आणि आजच्या टी२० सामन्याचा समावेश आहे.

या सामन्यात तब्बल ६ फलंदाज त्रिफळाचित झाले आहेत. यापूर्वी टी२० सामन्यात ६ त्रिफळाचित होण्याचा योग ४वेळा आला आहे.