कोलकाता वनडेत भारतीय संघाकडून २९ विश्वविक्रम

कोलकाता । भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना हा भारतीय संघाने ५० धावांनी जिंकला. हा सामना अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी खास ठरला. कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तर कुलदीप यादवने या सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली.

त्यामुळे या सामन्यात ओघानेच अनेक विक्रम झाले. ते सर्व विक्रम असे-


१० किंवा त्यापेक्षा कमी धावा देऊन ३ विकेट्स २ वेळा घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला गोलंदाज बनला.


सर्वाधिक सामनावीर पुरस्कार वनडेमध्ये मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली ४था. सचिन(६२), गांगुली(३१), युवराज(२७) आणि कोहली(२५) यांनी सर्वाधीक सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत .


कुलदीप यादव आणि श्रीलंकेचा वनिंदूं हंसरंगा हे दोनच रिस्ट स्पिनर आहेत ज्यांनी वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली आहे.


कर्णधार म्हणून विराटचा हा सलग १२ वा आतंरराष्ट्रीय विजय होता. भारत गेले १२ आंतरराष्ट्रीय सामने जिंकला आहे.


ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच इडन गार्डनवर पराभूत झाला आहे. आधीच्या २ वनडे पैकी दोनही वनडे हा संघ जिंकला आहे.


ऑस्ट्रेलिया परदेशात खेळलेल्या गेल्या १२ वनडे सामन्यात एकही सामना जिंकली नाही. १२ पैकी २ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही तर १० सामने पराभूत झाली आहे.


कर्णधार विराट कोहलीने सलग ८ वनडे जिंकण्याचा पराक्रम तिसऱ्यांदा केला आहे. (२०१३-१४, २०१४-१७ आणि २०१७ या काळात त्याने हा पराक्रम केला आहे. गांगुली, धोनी आणि द्रविड यांनी एकदा अशी कामगिरी केली आहे तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगने ५वेळा अशी कामगिरी केली आहे.


कुलदीप यादव हा अंडर-१९ वनडे सामन्यात आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याने २०१४ साली स्कॉटलँड विरुद्ध अंडर-१९ वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.


इडन गार्डनवर हॅट्रिक घेणारा कुलदीप तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव यांनी १९९१ साली श्रीलंका संघाविरुद्ध वनडेत तर २००१ साली हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात हॅट्रिक विकेट घेतली होती.

१०
वनडे मध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी हॅट्रिक विकेट घेतली आहे.

११
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव ५वा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव आणि चेतन शर्मा यांनी वनडेत तर हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटीत हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत.

१२
वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट्रिक विकेट घेणारा कुलदीप यादव पहिला फिरकी गोलंदाज बनला आहे.

१३
वनडेत हॅट्रिक विकेट घेणारा कुलदीप यादव ७वा फिरकी गोलंदाज आहे.

१४
कुलदीप यादवला चेन्नई वनडेत हॅट्रिक षटकार मारले गेले होते तर कोलकाता वनडेत त्याने हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत.

१५
या वर्षी श्रीलंकेचा वनिंदूं हंसरंगा आणि कुलदीप यादव या दोन गोलंदाजांनी हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत.

१६
जडेजा ह्या मालिकेत अजून एकही सामना खेळला नाही परंतु बदली खेळाडू म्हणून दोन झेल घेतले आहेत.

१७
आपल्या १००व्या वनडेत ५०+ धावा करणारा स्मिथ हा ५वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

१८
प्रथम फलंदाजी करताना प्रथमच भारतीय संघ भारतात गेल्या ४ वर्षात सर्वबाद झाला आहे.

१९
यापूर्वी भारतात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारतीय संघ २००९ साली गुवाहाटी वनडेत सर्वबाद झाला होता.

२०
गांगुली धोनी आणि कोहलीचा वनडेत सर्वोत्तम स्कोर हा १८३ आहे तर हे नर्व्हस ९०चे शिकार देखील प्रत्येकी ६वेळा झाले आहेत.

२१
बुमराह यापूर्वी ४८ आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही चौकार मारला नव्हता. आज एकाच सामन्यात २ चौकार मारले आहेत.

२२
विराट कोहली ५व्यांदा ९०-९९ धावांत बाद झाला आहे. तर तो एकदा ९६ धावांवर नाबाद राहिला आहे.

२३
भारताकडून सर्वाधिक वेळा ९०ते ९९ धावांत बाद किंवा नाबाद राहायचा विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावावर आहे. सचिन(१८), मोहम्मद अझरुद्दीन(७), वीरेंद्र सेहवाग(६), गांगुली(६), धोनी(६) आणि विराटही(६) हे फलंदाज ९० ते ९९ मध्ये बाद झाले आहेत किंवा नाबाद राहिले आहेत.

२४
विराट कोहली गेल्या ५वेळा जेव्हा ० धावेवर बाद झाला आहे त्याच्या पुढच्या सामन्यात त्याने ९२, ७६*, ४०, १२३ आणि ८६ अशा धावा केल्या आहेत.

२५
विराट कोहली आणि साथीदार यात ११ वेळा विराट धावबाद झाला आहे तर त्याचा साथीदार १२ वेळा धावबाद झाला आहे.

२६
भारतीय कर्णधाराने एका वर्षात सर्वाधिक अर्धशतके करायचा विक्रमाची विराटकडून बरोबरी. अझहर १९९८ आणि धोनी २००९ यांनी ११ अर्धशतके केली होती.

२७
विराट कोहलीने गेल्या ३० वनडेत १२व्यांदा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

२८
अजिंक्य रहाणेने गेल्या ८ सामन्यात ५व्यांदा अर्धशतक केले आहे.

२९
गेल्या ७ वनडे सामन्यात ५व्यांदा विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.