दुसऱ्या वनडे सामन्यात झालेले खास ५ विक्रम!

सेंच्युरियन । भारताने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने अर्धशतक केले, तसेच भारताकडून युझवेन्द्र चहलने ५ बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

या सामन्यातील काही खास विक्रम-

-दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेत हा वनडेतील सर्वात मोठा पराभव (१७७ चेंडू राखून)

-भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ दुसऱ्यांदा सलग दोन वनडे सामन्यात विजय मिळवला आहे.

-विराट कोहली हा वनडेत १० हजार चेंडू खेळणारा केवळ ६वा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी सचिन, द्रविड, गांगुली, अझहर आणि धोनी यांनी अशी कामगिरी केली आहे.

-युझवेन्द्र चहलची ५/२२ ही वनडेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

-युझवेन्द्र चहल हा दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट घेणारा पहिला फिरकी गोलंदाज

-युझवेन्द्र चहल: ५/२२ ही दक्षिण आफ्रिकेतील फिरकी गोलंदाजांची दुसरी सर्वोत्तम कामगिरी. आफ्रिकेच्या निकी बोयेने २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

-युझवेन्द्र चहल: आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत वनडेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी. वासिम अक्रम यांनी १६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत ५ विकेट्स घेणारा युझवेन्द्र चहल हा सुनील जोशी यांच्यानंतरचा दुसराच भारतीय फिरकी गोलंदाज

-११८ ही दक्षिण आफ्रिकेची वनडेतील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी ते इंग्लंडविरुद्ध २००९मध्ये ११९ धावांवर बाद झाले होते.

-आशिष नेहरा(२००३) आणि युझवेन्द्र चहल ह्या दोनच भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेत ५ विकेट्स घेतल्या आहेत.