५०० वा रणजी सामना खेळणाऱ्या मुंबई टीमबद्दल ह्या गोष्टी माहित आहेत का? ?

मुंबई रणजी टीम उद्या रणजी इतिहासातील ५००वा सामना खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ४१वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाबद्दल ह्या खास गोष्टी-

– मुंबईने ८३ रणजी स्पर्धांपैकी ४१ वेळा मुंबईने विजेतेपद जिंकले आहे. ४९.३९%वेळा मुंबईने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

-१९३४-३५ साली मुंबईचा संघ पहिलीच रणजी ट्रॉफी स्पर्धा उत्तर भारताला पराभूत करून जिंकला होता.

-मुंबई संघ आजपर्यंत ४६वेळा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला आहे. त्यात केवळ ५ वेळा मुंबई संघ पराभूत झाला आहे.

-१९५६-५७ ते १९७६-७७ या काळात मुंबई संघ २२ पैकी २० लढती जिंकला होता.

-रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा मुंबईकर वासिम जाफरने केल्या आहेत. त्याने १२९ सामन्यात २०१ डावात ५६.९८च्या सरासरीने १०१४३ धावा केल्या आहेत. त्यातील ९७५९ धावा त्याने मुंबईकडून केल्या आहेत.

-देशांतर्गत क्रिकेट स्पर्धात मुंबई (४१) पेक्षा केवळ न्यू साऊथ वेल्स हा ऑस्ट्रेलियाचा संघ शेफील्ड शिल्ड स्पर्धेचे ४६ वेळा विजेतेपद जिंकू शकला आहे.

-पद्माकर शिवलकर यांनी मुंबईकडून खेळताना ३६१ विकेट्स घेतल्या आहेत.

-एका मोसमात मुंबईकडून सर्वाधिक धावा (१३२१) करण्याचा श्रेयस अय्यरच्या नावावर आहे. त्याने २०१५-१६मध्ये हा विक्रम केला होता.

-मुंबईने एका डावात ६बाद ८५५ धावा केल्या आहेत. १९९०-९१च्या मोसमात मुंबईने ह्या धावा हैद्राबादविरुद्ध केल्या आहेत.

-संजय मांजरेकर यांनी एका डावात मुंबईकडून सर्वोच्च(३७७) धावा केल्या आहेत