विराटकडून दिल्ली कसोटीत ५ खास विक्रम

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खणखणीत चौकार खेचत विराट कोहलीने कसोटीत ५ हजार धावांचा टप्पा पार केला. यावेळी मैदानावर आलेल्या दिल्लीकर प्रेक्षकांनी कोहली-कोहली अशा जोरदार घोषणा दिल्या.

या खेळाडूने ५ हजार धावा करताना अनेक विक्रम केले. ते असे

– भारताकडून ५ हजार धावा करणारा केवळ ११ वा खेळाडू

-भारताकडून कमी डावात ५ हजार धावा करणारा चौथा खेळाडू, १०५ डावात केली ही कामगिरी. सुनील गावसकर (९५), वीरेंद्र सेहवाग(९८) आणि सचिन तेंडुलकर (१०३) यांनी कमी डावात ही कामगिरी केली आहे.

-सध्या कसोटी खेळत असलेल्या खेळाडूत कमी डावात ५ हजार धावा करणारा दुसरा खेळाडू. स्टिव्ह स्मिथने ९७ डावात ही कामगिरी केली आहे.

-कसोटी क्रिकेटमध्ये जगात ५ हजार धावा करणारा विराट ९४वा खेळाडू

-भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी कमीतकमी २ हजार धावा केल्या आहेत त्यात विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अर्धशतकांपेक्षा जास्त शतके केली आहेत.