विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेत बोलबाला; केले १० कसोटी विक्रम

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त १५३ धावांची खेळी केली. विराटच्या ह्याच खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या.

या खेळीमुळे खऱ्या अर्थाने भारतीय संघाने या कसोटीत जोरदार पुनरागमन केले. ह्या कसोटीत कोहलीने केलेले विक्रम-

-विराट कोहलीने २०१७ आणि २०१८मध्ये वर्षातील पहिले शतक हे १५ जानेवारी रोजी केले आहे.

-कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहलीने ८व्यांदा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

-विराट कोहलीच्या गेली १२ कसोटी शतके: १६९, १४७, १०३, २००, २११, १६७, २३५, २०४, १०३*, १०४*, २१३, २४३ आणि १५३

-दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन (१६९, १५५), पुजारा (१५३) पाठोपाठ विराट तिसऱ्या स्थानावर

-कर्णधार म्हणून कोहलीने भारतात कसोटीत ३२ डावात ७ तर परदेशात २२ डावात ७ शतके केली आहेत.

-स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटीत ५४ डाव खेळले आहेत. त्यात स्मिथने १५ तर विराटने १४ शतके केली आहेत.

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटाचे हे २४वे शतक होते. त्याने पॉन्टिंग(४१), ग्रॅमी स्मिथ(३३) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे तर चौथ्या स्थानी २० शतकांसह स्टिव्ह स्मिथ आहे.

-२०११पासून कसोटीत परदेशात विराटचे हे ११वे शतक आहे. १० शतकांसह दुसऱ्या स्थानी स्टिव्ह स्मिथ आहे.

-दक्षिण आफ्रिकेत २ किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा कोहली हा सचिननंतरचा दुसरा भारतीय खेळाडू

-सेंच्युरियनवर शतकी खेळी करणारा विराट हा केवळ ५वा कर्णधार आहे. अशी कामगिरी करणारा केवळ पहिला परदेशी खेळाडू

-दक्षिण आफ्रिकेत शतकी खेळी करणारा विराट हा सचिन पाठोपाठ केवळ दुसरा भारतीय कसोटी कर्णधार

-परदेशात भारतीय कर्णधार म्हणून विराटचे हे ७वे शतक. दुसऱ्या स्थानी ५ शतकांसह मोहम्मद अझरुद्दीन तर तिसऱ्या स्थानी ४ शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

-विराट कोहलीचे हे कर्णधार म्हणून कसोटीतील १४वे शतक. आशियातील कर्णधारांमध्ये केवळ माहेला जयवर्धनेला ही कामगिरी जमली आहे.