टॉप ५: कोहलीचे हे वनडे’मधील विराट विक्रम !

कोलंबो । भारतीय संघाचा विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना वनडे कारकिर्दीतील ३०वे शतक केले. याबरोबर भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला.

या मालिकेत दोन शतकी खेळी करणाऱ्या विराटने याबरोबर अनेक विक्रम केले. हे सर्व विक्रम

१. सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी. रिकी पॉन्टिंग आणि विराटची सारखीच ३० शतके

२. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह पहिल्या स्थानावर

३. विराट कोहलीने सलग दोन सामन्यात शतकी खेळी करण्याची ही ५वी वेळ होती. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने ६वेळा अशी कामगिरी केली आहे.

४.भारतीय संघाचा वनडे कर्णधार म्हणून ही कोहलीची ८वी शतकी खेळी होती

५. विराटने १८६ वनडे इंनिंगमध्ये ३० शतके केली आहेत. सचिनने एवढ्याच डावात १६ तर पॉन्टिंगने १५ शतके केली होती.

६.वनडे सामन्यात ३० शतके करण्यासाठी विराट कोहलीला १८६ डाव तर सचिनला २६७ आणि पॉन्टिंगला ३४९ डाव लागले होते.

७. विराट कोहलीने यावर्षी १८ सामन्यात ९२.४५ च्या सरासरीने १०१७ धावा केल्या आहेत. यावर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा विराट पहिला खेळाडू आहे.

८. विराटने ५व्यांदा कारकिर्दीत एका वर्षात १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा वनडे सामन्यात केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अशी कामगिरी ७ वेळा तर गांगुली, संगकारा आणि पॉन्टिंग यांनी ६वेळा केली आहे.

९. विराट कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेतील ४थे वनडे शतक होते.

१०. वयाच्या २८व्या वर्षी विराटने ३० वनडे शतके केली आहेत.

११. या वर्षी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटची सरासरी ही सर्वात जास्त अर्थात ९२.४५ आहे. दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून धोनीची सरासरी ९१.३३ आहे.