कर्णधार कोहलीचे कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल २० विश्वविक्रम !

दिल्ली । नागपूर कसोटीनंतर कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कसोटीतही द्विशतकी खेळी केली. ही खेळी करताना कर्णधाराने दुसऱ्या दिवशी अनेक विक्रम केले. ते असे-

– जानेवारी २०१६पासून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये १८ शतकांसह विराट अव्वल. १५ शतकांसह वॉर्नर दुसरा.

-कर्णधार म्हणून कोहलीने केलेली शतके: 243, 213, 104*, 103*, 204, 235, 167, 211, 200, 103, 147, 141, 115

-यावर्षी कसोटीत १ हजार धावा करणारा पुजारा, एल्गार आणि करुणरत्नेनंतर तिसरा खेळाडू

-सलग दोन वर्ष कसोटीत १ हजार धावा करणारा सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरनंतर तिसरा खेळाडू

-सलग दोन वर्ष कसोटीत १ हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार

-२४३ हा विराटचा कसोटीमधील सर्वोच्च स्कोर

-भारतीय कर्णधाराने कसोटीत केलेला (२४३ धावा) हा सर्वोच्च स्कोर. यापूर्वीचा २३५ धावांचा स्वतःचाच विक्रम मोडला

-कारकिर्दीत स्वतःच्या सर्वोच्च धावांचा विक्रम (career-best score)कसोटीत विराटने तब्बल १४ वेळा मोडला आहे. हा विक्रम आहे. दिलीप वेंगसकर यांनी १२ वेळा हा विक्रम केला होता.

– विराट कोहलीने यावर्षी वनडे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात १ हजार धावा केल्या आहेत.

-जुलै २०१६पासून कसोटी कर्णधार म्हणून विराटने ६ द्विशतके केली आहेत. बाकी एकाही कर्णधाराला याकाळात एकही द्विशतक करता आले नाही.

-विराट कोहलीने या मालिकेत १ हजार मिनिटांपेक्षा जास्त काळ फलंदाजी केली आहे.

-विराट कोहलीने २०१६ आणि २०१७ या दोन्ही वर्षात प्रत्येकी ३ द्विशतके केली आहेत.

-एका कसोटी मालिकेत २ द्विशतके करणारा विराट विनू मंकड यांच्यानंतर केवळ दुसरा भारतीय खेळाडू

-कर्णधार नात्याने घराच्या मैदानावर द्विशतकी खेळी करणारा विराट सुनिल गावसकर(मुंबई) यांच्यानंतर दुसरा खेळाडू

-भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याने विराटने २००,१७५, १५० आणि १०० धावा सर्वाधिक वेळा केल्या आहेत.

-विराटने कारकिर्दीत सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात द्विशतक साजरे केले आहे.

-१९३२ ते २०१५ या काळात भारतीय कर्णधारांनी कसोटीत केवळ ४ द्विशतके केली आहेत. २०१६ नंतर एकट्या विराटने कर्णधार म्हणून ६ द्विशतके केली आहेत.

-सलग दोन कसोटी डावात द्विशतके करणारा विराट जगातील केवळ ६वा खेळाडू

-भारताकडून सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम आता संयुक्तपणे विराट, सचिन आणि सेहवागच्या नावावर

-कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटकमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम आता विराट(६) च्या नावावर. लाराचा ५ द्विशतकांचा विक्रम मोडला.