भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी 17-वर्षांखालील संघावर केलेल्या टिप्पणीची माफी मागितली आहे.

‘मी जे काही 17-वर्षांखालील संघाबद्दल बोललो त्याबद्दल माफी मागतो. मी भारतीय फुटबॉलबरोबर येथे मागील 7 वर्षापासून असून मला काही वाईट बोलायचे नाही’, असे कॉन्स्टन्टाईन यांनी त्याच्या ट्विटर हॅंडलवरून सांगितले आहे.

‘मला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनन (एआयएफएफ) आणि भारतीय फुटबॉलचा खूप आदर आहे. मी प्रशिक्षणामध्ये माझे 100%योगदान देत आहे’, असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये सांगितले.

2017च्या 17-वर्षांखालील फिफा विश्वचषकात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीबद्दल एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी कौतुक केले होते. पण कॉन्स्टन्टाई यांनी केलेल्या काही विधानांनी त्याच्यावर वेगळाच प्रभाव पडला आहे.

“17-वर्षांखालील संघाला सरावाची खूप आवश्यकता असून ते या स्पर्धेत पराभूत होणार असून त्यांनी या स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. मला माहित नाही ते पुढे कसे खेळतील.”

“तसेच संघाने कामगिरी बरी केली. पहिली गोष्ट म्हणजे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हाता. पण ही स्पर्धा भारतात झाल्याने भारतीय संघ त्यामध्ये खेळला”, अशा प्रकारची विधाने कॉन्स्टन्टाईन यांनी केली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी

एफसी पुणे सिटी संघाकडून किनन अल्मेडा करारबद्ध