२०१९च्या विश्वचषकासाठी धोनी संघात असायलाच पाहिजे…

2019ला इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक 30 मे ते 14 जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. या मोठ्या स्पर्धेआधीच भारतीय संघात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. यातील सगळ्यात गंभीर बाब म्हणजे यशस्वी यष्टीरक्षक एमएस धोनीचा वन-डे मधील सध्याचा फॉर्म.

धोनी या जुलै महिन्यात 37 वर्षाचा झाला आहे. यामुळे त्याच्या वयाचा विचार करता मर्यादित षटकातील क्रिकेट सामन्यात त्याचे परिणाम दिसून येत आहेत. यामुळे त्याला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतूनही खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते.

त्यामुळे 2019 च्या विश्वचषकात धोनीला स्थान द्यावे की नाही याबद्दल अनेकांनी आपली मते मांडली आहेत. यातच चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीला 2019च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात घेण्यास यावे असे मत मांडले आहे.

“मागील आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मी धोनीचा खेळ बघितला आहे. त्याने उत्तम फलंदाजी आणि यष्टीरक्षण केले होते. तसेच त्याच्यामध्ये सामना पलटवण्याची ताकद आहे”, असे फ्लेमिंग म्हणाले.

“सध्या धोनीचा फॉर्म बघता संघनिवड समितीने त्याला भारतीय संघातून खराब कामगिरीमुळे वगळले आहे. परंतु विश्वचषकासाठी त्याचा विचार करण्यात यावा.”

संघातून बाहेर असलेला धोनी सध्या रांचीमध्ये सुट्टयांची मजा घेत आहे. त्यामुळे तो जेएचसी क्रिकेट क्लब, रांची, झारखंड येथे सुरु असलेल्या स्थानिक टेनिस स्पर्धेत सामील झाला होता. यामध्ये त्याने दुहेरीत विजेतेपदही पटकावले आहे.

तसेच धोनी आॅस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारीमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल असे अपेक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य

तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा दुर्मिळ पराक्रम

कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी