अबब! स्लोन स्टीफन्सला मिळणार एवढी मोठी बक्षीस रक्कम

न्यूयॉर्क । तब्बल ११ महिन्यांच्या दुखापतीमधून सावरून स्लोन स्टीफन्सने जुलै महिन्यात पुन्हा टेनिसमध्ये कमबॅक केले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीसवर ६-३, ६-० असा विजय मिळवत अमेरिकन ओपन जिंकली.

आपल्या जवळच्या मैत्रिणीला अर्थात मॅडिसनला पराभूत करत स्लोन स्टीफन्सने हे विजेतेपद जिंकले. यावर्षीची अमेरीकन ओपन ही टेनिस जगातील सर्वात श्रीमंत स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. तब्बल $50.4 million एवढी मोठी एकूण बक्षिसाची रक्कम या स्पर्धेत दिली जाणार आहे.

विजेत्या महिला आणि पुरुष खेळाडूला सारखीच अर्थात $3.7 million एवढी मोठी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे स्लोन स्टीफन्सला तब्बल ३.७ मिलियन अमेरिकन डॉलरचा चेक मिळणार आहे.

१९६८ साली अमेरिकन ओपनच्या पहिल्या महिला खेळाडूला $6,000 तर पुरुष खेळाडूला $14,000 देण्यात आले होते.