निवृत्ती घेतलेला एबी आणि बंदी असलेला स्मिथ आता खेळणार या संघाकडून

इस्लामाबाद | सध्या पाकिस्तान प्रीमियर लीगचा लिलाव इस्लामाबाद शहरात सुरु आहे. ही स्पर्धा १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु होणार आहे.

या लिलावात ६६३ परदेशी खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार असून त्यात इस्लामाबाद युनायटेड, पेशावर झाल्मी, क्वेटा ग्लॅडियेटर, कराची किंग्ज, लाहोर क्वालॅंडर्स आणि सहावा संघ (मुलतान सुलतान्ज) यांचा समावेश आहे.

एबी डिव्हिलीयर्सला यातील लाहोर क्वालॅंडर्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे. एबीने मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय केले होते.

स्टीव स्मिथ सध्या १२ महिन्यांच्या बंदीला सामोरे जात असून त्याला या स्पर्धेतील सहाव्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे. गेल्या हंगामात या संघाचे नाव मुलतान सुलतान असे होते. यावेळी या संघाची मालकी आणि नाव बदलणार आहे.

स्मिथ यापुर्वी आयपीएल, बीग बॅश, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि ग्लोबल टी२० लीग, कॅनडामध्ये खेळला आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

२०११विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील ३ खेळाडू आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत करणार समालोचन

एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमानाबद्दलच हे आहे मोठे वृत्त

Breaking- पहिल्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या १२ खेळाडूंच्या नावाची घोषणा

वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार

तर आणि तरच टीम कोहलीकडून होणार तगडा विक्रम...