विक्रमवीर स्टिव्ह स्मिथ; केले हे ५ खास विक्रम

पर्थ । ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यापासून स्टिव्हन स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय उच्च दर्जाची कामगिरी केली आहे. अनेक विक्रम करताना त्याने आपल्या संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. आजही या खेळाडूने इंग्लंड संघाविरुद्ध चांगली कामगिरी करताना द्विशतकी खेळी आहे. त्याला या सामन्यात त्रिशतक करण्याची संधीही आहे.

या सामन्यात त्याने केलेले हे विक्रम
-९व्यांदा स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च स्कोर उंचावलेला आहे. डॅमियन मार्टिनने ऑस्ट्रेलियाकडून १० वेळा अशी कामगिरी केली आहे तर जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली (१४)च्या नावावर आहे.

-८०वर्षातील ॲशेस मालिकेत केलेले हे वेगवान द्विशतक आहे. स्मिथने ३०१ चेंडूत २०० धावा आज केल्या.

-गेल्या २२ महिन्यात विराट कोहली सोडून द्विशतक करणारा स्टिव्ह स्मिथ हा केवळ दुसरा कर्णधार. विराटने या काळात ६ द्विशतके केली आहेत.

-स्टिव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाकडून ७२वे द्विशतक केले आहे.

-स्मिथचे हे दुसरे कसोटी द्विशतक आहे.

-स्टिव्ह स्मिथ हा ॲशेस मालिकेत द्विशतक करणारा ५वा कर्णधार आहे.