स्टिव्ह स्मिथचा शनिवारी सकाळीच कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम

पर्थ ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने जबरदस्त शतकी खेळी करताना एक खास विक्रम केला आहे. सलग ४ वेळा वर्षभरात १००० हजार धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.

कसोटी कारकिर्दीतील आपले २२वे शतक केवळ १०८व्या डावात करत त्याने या यादीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या सचिन तेंडुलकर(११४) लाही मागे टाकले आहे.

यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलियाच्याच हेडनने सलग ५ वेळा वर्षभरात १००० धावांचा टप्पा पार केला आहे.

स्मिथचे या सामन्यातील काही खास विक्रम-

-२०१४, २०१५, २०१६ आणि २०१७ अशा चार वर्ष सलग १००० धावा. असं करणारा हेडन (५वेळा)नंतर करणारा दुसरा खेळाडू

-५० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळून अर्धशतकांपेक्षा (२१) शतके (२२) अधिक करणारा स्मिथ केवळ ७वा खेळाडू. भारताकडून कोहली आणि अझरुद्दीन यांनी ही कामगिरी केली आहे.

– ॲशेस मालिकेत ७ शतके करणारा १०वा ऑस्ट्रेलियन खेळाडू

-कर्णधार म्हणून कमी डावात १४ शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मिथ (डाव-५१) आता तिसरा. ब्रॅडमन (३७) आणि माहेला जयवर्धने (५०) अव्वल.