दोन मोठ्या खेळाडूंना वगळले, विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

स्टिव स्मिथ आणि डेविड वाॅर्नरचा समावेश असलेल्या १५ सदस्यीय संघाची आज ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९साठी घोषणा केली. या संघात जोश हेजलवुड आणि पीटर हॅड्सकाॅमला मात्र स्थान देण्यात आले नाही.

१२ महिन्यांच्या बंदीनंतर माजी कर्णधार स्टिव स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वार्नर मात्र विश्वचषकासाठी पात्र ठरले असून संघाचे नेतृ्त्त्व अ्ॅराॅन फिंचकडे देण्यात आले आहे.

अॅलेक्स कॅरे या एकमेव यष्टीरक्षक फलंदाजाला संघात स्थान देण्यात आले असुन नेथन लायन आणि अॅडन झंपा या फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वेगवान गोलंदाजीची धुरा पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नेथन कल्टर लायन, ज्यो रिचर्डसन आणि जेसन बेनहाॅफच्या खांद्यावर असेल.

असा आहे विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलियाचा संघ- ऍराॅन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, स्टिव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, शाॅन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टाॅयनिस, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन कुल्टर नाईल, झाय रिचर्डसन, नॅथन लायन, ऍडम झंपा, आणि जेसन बेऱ्हेन्डॉर्फ