आॅस्टेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

आॅस्टेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ हा सध्या सुट्टीवर असुन तो न्यूयॉर्कमध्ये तो सुट्टीचा आनंद घेत आहे आणि या सुट्ट्यां सुरु असतानाच त्याने न्यूयॉर्कमधूनच त्याने आपण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी दिली आहे.

आपण लग्नाच्या बेडीत लवकर अडकणारअसुन खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेली गर्लफ्रेंड. “दानी विललिस” हिच्याशी लग्न करणार आहे असे त्याने त्याच्या इंनस्टागाम अकाउंट वरून जगजाहीर केले आहे.

स्टीव स्मिथने दानीला गुडघ्यावर बसुन तिला प्रपोज केले आणि ती नंतर तिने होकार दिला असल्याचंही त्याने इंस्टाग्रामवर म्हटलं आहे. स्टीव स्मिथ हा 28 वर्षाचा आहे तर दानी हि लाॅ स्टुडंट असुन “बिग बॅश लीग २०१२” चालू असताना एका बारमध्ये त्यांची भेट झाली.

-उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स )