१४१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले

0 203

कसोटी क्रिकेटमधील पहिला चेंडू १५ मार्च १८७७ साली टाकला गेला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक विक्रम कसोटी क्रिकेटमध्ये झाले. 

काही विक्रम हे चाहत्यांच्या ध्यानात राहीले तर काही विस्मरणात गेले. काही विक्रम हे चांगले होते तर काही विक्रम हे नकोसे. 

असे असले तरी ह्या आठवड्यात एक नकोसा असा  विक्रम झाला जो १४१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये कधीही पहायला मिळाला नाही. 

चेंडू छेडछाड प्रकरणी एखाद्या खेळाडूला (स्टीव स्मिथ ) कसोटी सामन्यात खेळण्यासाठी बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

यापुर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कधीही चेंडू छेडछाड प्रकरणी कोणत्याही खेळाडूवर बंदी घालण्यात आली नव्हती. शोएब अख्तर (२००३, दोन वनडे सामने),  शाहीद आफ्रिदी (२०१०, दोन टी२० सामने) यांना यापुर्वी बंदीला सामोरे जावे लागले होते परंतू ते वनडे आणि टी२० सामन्यात. 

शिवाय कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बंदीला सामोरे जाणारा तो पहिलाच पाकिस्तान बाहेरचा खेळाडू आहे. 

Comments
Loading...
%d bloggers like this: