स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने द्विशतकी खेळी केली.

स्मिथने या सामन्यात 319 चेंडूत 211 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक आहे.

त्याने हे शतक कसोटी कारकिर्दीतील 121 व्या डावात केले आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वात जलद 26 शतके करण्याच्या यादीत डॉन ब्रॅडमननंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे.

तसेच त्याने या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतके करणाऱ्या सचिनने कारकिर्दीतील 26 वे कसोटी शतक 136 व्या डावात केले होते. पण त्याच्यापेक्षा आता 15 डाव कमी खेळत स्मिथने कसोटीत 26 शतके करण्याचा पराक्रम केला आहे.

कसोटीत सर्वात जलद 26 शतके करण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी केवळ 69 डावात हा पराक्रम केला होता.

सध्या सुरु असलेल्या 2019 ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 23 धावा केल्या असून अजून ते 474 धावांनी पिछाडीवर आहेत.

#सर्वात जलद 26 वे कसोटी शतक करणारे क्रिकेटपटू – 

69 डाव – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

121 डाव – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

136 डाव – सचिन तेंडूलकर (भारत)

144 डाव – सुनील गावस्कर (भारत)

145 डाव – मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार शतकी खेळीबरोबर स्टिव्ह स्मिथने केले हे खास ५ विक्रम

संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक