स्टीव स्मिथच्या त्या दोन जबरदस्त विकेट्स पाहिल्यात का?

फ्लोरीडा | कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका थलाईवाज विरुद्ध बार्बाडोस ट्रायडेंट सामन्यात बार्बाडोस ट्रायडेंटने २ गुणांनी विजय मिळवला. यात आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने अष्टपैलू कामगिरी केली.

या सामन्यात स्मिथलाच सामनावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. स्मिथने फलंदाजीत ४४ चेंडूत ६३ धावा तसेच गोलंदाजी करताना ३ षटकांत १९ धावा देता २ विकेट्स घेतल्या.

जमैका थलाईवाजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बार्बाडोस ट्रायडेंटने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. यातील ६३ धावा एकट्या स्मिथने केल्या.

यानंतर १५७ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या जमैका थलाईवाजने २० षटकांत ३ बाद १५३ धावा केल्या.

या सामन्यात जमैका थलाईवाजच्या दोन्ही फलंदाजांना स्मिथने तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या याच कामगिरीमुळे बार्बाडोस ट्रायडेंटला सामना जिंकण्यासाठी मदत झाली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश