बंदी घातेलला स्टिव स्मिथ खेळणार चौथ्याच संघाकडून

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टिव स्मिथ बांगलादेश प्रीमियर लीगच्या (बीपीएल) सहाव्या हंगामात खेळणार आहे. तो या लीगमध्ये कोमिला विक्टोरियन्स या संघाकडून खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्च महिन्यात शेवटचा सामना खेळलेल्या स्मिथवर चेंडू छेडछाड प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने त्याच्यावर खेळण्यावर बंदी घातली आहे.

स्मिथने यावर्षाच्या सुरूवातीस कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) बार्बाडोस ट्रीडेंट्स संघाकडून खेळला होता. तसेच तो कॅनडा टी20 लीगमध्यही खेळला आहे. तसेच पाकिस्तान प्रीमियर लीगमध्येही त्याने सहभाग नोंदवला आहे.

त्याच्याबरोबरच डेव्हिड वॉर्नरही बीपीएलच्या सिलहेट सिक्सर्सकडून खेळणार आहे.

5 जानेवरी 2019 पासून सुरू होणाऱ्या बीपीएलमध्ये स्मिथला पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकच्या जागी घेण्यात आले आहे. मलिक न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळणार असल्याने तो या लीगमधील काहीच सामने खेळणार आहे.

सीपीएलमध्ये स्मिथने सात डावांमध्ये दोनवेळा चाळीस धावा आणि एक अर्धशतक केले होते. गोलंदाज म्हणून करियरला सुरूवात करणाऱ्या या खेळाडूने या लीगमध्ये तीन विकेट्सही घेतले होते.

तसेच स्मिथ फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळणार आहे तर वॉर्नरने मात्र या लीगमध्ये खेळण्यास नकार दिला. या दोघांवरील बंदी 29 मार्च 2019ला संपणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय

मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर

आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील टीम इंडियाची संकट काही कमी होईनात