ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! कर्णधार स्टिव्ह स्मिथ टी२० मालिकेतून बाहेर

रांची । खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ भारताबरोबर होणाऱ्या टी२० मालिकेत खेळणार नसून तो मायदेशी परतणार आहे.

मार्कस स्टोइनिकस स्टिव्ह स्मिथच्या जागी खेळणार असून डेविड वॉर्नर कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. ऑस्ट्रेलिया संघ वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कसोटी मालिकेत स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली पराभूत झाला होता तर ह्याच महिन्यात वनडे मालिका १-४ असा पराभूत झाला.

ऑस्ट्रेलियन संघाचे डॉक्टर रिचर्ड्स सॉ म्हणाले, ” रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटच्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना खांद्यावर पडल्यामुळे स्मिथ जखमी झाला आहे. सामन्यानंतर त्याने खांद्याच्या दुखापतीबद्दल सांगितले. ”

“त्याचे एमआरआय स्कॅन झाल्यावर ही जखम गंभीर असल्याचे समोर आले आहे. “

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना आज रांची येथे होणार आहे.