स्टीव्ह स्मिथ ठरला ‘बॉर्डर मेडलचा’ मानकरी

0 210

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मेलबर्नमध्ये दुसऱ्यांदा अॅलन बॉर्डर मेडल जिंकले आहे. स्मिथ गेले १२ महिने चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याचा हा फॉर्म मागच्या महिन्यात पार पडलेल्या ऍशेस मालिकेतही दिसून आला आहे.

स्मिथने हा डॉन ब्रॅडमन यांच्या काळापासूनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरला आहे. यासाठी त्याला २४६ मते मिळाली आहे. हा पुरस्कार पटवण्यासाठी त्याने दोन वेळच्या बॉर्डर मेडल विजेत्या डेव्हिड वॉर्नरला(१६२ मते) आणि नॅथन लीऑनला (१५६ मते) मागे टाकले आहे.

२०१७ या वर्षात स्मिथ ११ कसोटी आणि १३ वनडे सामने खेळला आहे. या २४ सामन्यात मिळून त्याने ७ शतके आणि ७ अर्धशतकांसह ६४.९६ च्या सरासरीने १७५४ धावा केल्या आहेत.

तसेच त्याने यावर्षी ऍशेस मालिकचा मालिकावीर पुरस्कार मिळवला होता.याबरोबरच स्मिथ यावर्षीचा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू ठरला आहे. स्मिथ २०१५ मध्ये पहिल्यांदा या बॉर्डर मेडलचा मानकरी ठरला होता.

स्मिथने हे बॉर्डर मेडल मिळवून रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्क, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पंगतीत बसण्याचा मान मिळवला आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलीस पेरीने २०१७ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दुसऱ्यांदा बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळवला आहे. तिने या आधी २०१६मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. याबरोबरच पेरी यावर्षीची आयसीसीची सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूही ठरली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: