विश्वविजेत्या कर्णधारचा मुलगा करतोय क्रिकेटमध्ये पदार्पण

ऑस्ट्रेलियाच्या महान क्रिकेटपटू स्टिव्ह वॉ मुलगा ऑस्टिन वॉला ऑस्ट्रेलियाकडून अंडर १९ विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलँड येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व फलंदाज जेसन संघा करेल.

या संघात ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांचा मुलगा विल सदरलँड हा देखील खेळणार असून त्याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात जेसन संघा हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध क्रिकेट ऑस्ट्रेलिया ११ कडून शतकी खेळी करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

विल सदरलँडहा फुटबॉलर आणि क्रिकेटपटू असून त्याने कारकीर्द क्रिकेटमध्ये करायचे ठरवले आहे. तो एक चांगला फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहे.

स्टिव्ह वॉचा मुलगा ऑस्टिन वॉने २०१६मध्ये राष्ट्रीय अंडर १७ चॅम्पियनशिप स्पर्धेत नाबाद शतक केले होते तर ऑस्ट्रेलिया अंडर १९कडून श्रीलंका संघाविरुद्ध वनडेत भाग घेतला होता.
रायन हॅरिस हा या संघाचा कोच असून माजी फलंदाज ख्रिस रॉजर्स त्याचा सहाय्यक असणार आहे.

क्रिकेटचा अंडर १७ विश्वचषक १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलँड येथे होणार असून १४ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलिया संघ पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध आपले अभियान सुरु करणार आहे.