इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही वाटते या दोन भारतीय क्रिकेटपटूंची भीती…

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ 22 मे रोजीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

पण विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील खेळाडूंबरोबरच भारताचे काही आजी-माजी क्रिकेटपटूही इंग्लंडमध्ये इंडियन क्रिकेट हिरोज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम 23 मे ला लंडन येथे पार पडला.

या कार्यक्रमासाठी भारताचे मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग हे क्रिकेटपटू देखील उपस्थित होते. या दोघांचा लॉर्डच्या मैदानावरील एक फोटो कैफने ट्विटरवर शेअर केला आहे.

तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की ’17 वर्षांनंतर पून्हा एकदा युवराजबरोबर लॉर्ड्सच्या मैदानावर! भारतीय संघाला शुभेच्छा आणि आशा आहे की विराट कोहली आणि त्याचा संघ 14 जूलैला इथे विश्वचषक विजेतेपद मिळवतील.’

कैफच्या या ट्विटवर कमेंट करताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने म्हटले आहे की ‘ उठताना असा फोटो पाहण्याची पहायला मिळू नये. या दोघांची अजूनही भीती वाटते.’

यामागील कारण असे की 2002 मध्ये 13 जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या नॅटवेस्ट वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध कैफ आणि युवराज या जोडीने भारताकडून 6 व्या विकेटसाठी 121 धावांची भागिदारी केली होती. त्यामुळे भारताने त्या सामन्यात विजय मिळवत मालिकाही जिंकली होती.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना त्यावेळी त्यांचा कर्णधार असलेल्या नासिर हुसेनने आणि मार्कस ट्रेस्कॉथिकने केलेल्या शतकी खेळींच्या जोरावर 325 धावांचा डोंगर उभा केला होता.

पण भारताकडून सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर असे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतरही कैफ आणि युवराजने मोक्याच्या क्षणी केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताने 326 धावांचे आव्हान यशस्वीपणे पुर्ण केले होते.

या सामन्यात भारताकडून कैफने सर्वाधिक नाबाद 87 धावांची खेळी केली होती. तसेच युवराजने 67 धावांची तर त्यावेळी भारताचा कर्णधार असणाऱ्या गांगुलीने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

विशेष म्हणजे याच विजयानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनची खूप चर्चा झाली होती.

तसेच मागीलवर्षी 13 जूलैलाच या सामन्यात सामनावीर ठरलेल्या कैफने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. या सामन्याने कैफला प्रकाशझोतात आणले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: टीम इंडियाला धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू झाला दुखापग्रस्त

या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद

विश्वचषकात खेळणाऱ्या स्मिथ-वाॅर्नर जोडीबद्दल फिंचने केले मोठे वक्तव्य