स्म्रिती मानधनाला आवडतो हा बॉलीवूड स्टार !

भारतीयांना सर्वाधिक प्रभावीत करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे क्रिकेट आणि बॉलीवूड. या दोनीही गोष्टी हातात हात घालून पुढे चालतात आणि याचे एक मोठे उदाहरण म्हणजे आयपीएल.

बॉलीवूड स्टार आणि क्रिकेट स्टार यांच्यातील जवळीक भारतीयांना काही नवीन नाही. मग ते मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी, मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर असो वा अगदी युवराज सिंह आणि हझेल कीच्, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असो.

पुरुष क्रिकेटर्स व बॉलीवूडमधील महिला यांच्यातील जवळीकतेच्या ही पुढे जाऊन आता एक नवीन गोष्ट पुढे आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधनाने मोठा खुलासा करत सांगितले आहे की तिला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेता आवडतो.

तिने पत्रकारांशी बोलताना सांगितले की तिचा आवडता अभिनेता सुपरस्टार हृतिक रोशन आहे. हृतिक रोशनचे चाहते भारतातच नाही तर जगभरात आहे आणि त्या पैकी स्म्रिती एक आहे. तिला त्याच्या आवडत्या सिंगर बद्दल विचारले असता तिने अरिजित सिंगचे नाव घेतले.