वेस्ट इंडिज- अफगाणिस्तान सामन्यात स्टॅम्प्सवरील बेल्स गायब

९ जून हा सामना आशियायी संघ अफगाणिस्तान आणि बांगलादेश कधीही विसरू शकत नाही कारण त्या दिवशी या संघांनी अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि

न्युझीलँड या संघांवर विजय मिळविला. परंतु त्याच दिवशी आणखी एक विरळ घटना अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात झाली. ह्या सामन्यात स्टॅम्प्सवर बेल्स न ठेवताच हा सामना खेळवण्यात आला.

अफगाणिस्ताने ६३ धावांनी विजय मिळविलेल्या ह्या सामन्यात मैदानात जोरदार वारे वाहत होते. डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस इसलेट, सेंट लुसिया येथे सुरु असलेल्या या सामन्यात काही षटक खेळल्यावर अचानक जोराचे वारे वाहू लागले. त्यामुळे स्टॅम्प्सवर बेल्स ठेवणं अवघड झाल्यामुळे दोनही बाजूंनी त्या काढून टाकण्यात आल्या आणि खेळ पुढे सुरु ठेवण्यात आला.

क्रिकेट नियम काय सांगतो
एमसीसीच्या नियम क्रमांक ८.५ प्रमाणे दोनही कर्णधार जर बेल्सशिवाय खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी तयार असतील आणि त्याला पंचांचा होकार असेल तर सामना पुढे सुरु ठेवता येऊ शकतो. परंतु त्यासाठी कारणही लागते जसे की या सामन्याच्यावेळी जोरदार वारा वाहत होता.