भारताला मोठा धक्का, विराट कोहली १३ धावांवर बाद

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली १३ धावांवर बाद झाला. त्याला रंगना हेराथने अँजेलो मॅथवेकरावी झेलबाद केले.

स्लीपमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथवेने विराट कोहलीचा सूर मारत झेल घेतला. विराट कोहलीच्या विकेट बरोबर भारताची तिसरी विकेट पडली. विराटने या खेळीत २ चौकार मारले.

सद्यस्थितीत भारत १३४/३ असून चेतेश्वर पुजारा २८ धावांवर तर रहाणे ० धावांवर खेळत आहे.