सुलतान अझलन शाह हॉकी कपमध्ये भारताने जपानला ४-३ असे केले पराभूत…

पिछाडीवर असताना देखील मनदीप सिंगच्या हॅट्रीकच्या तर रुपिंदर पाल सिंगच्या पेनल्टीच्या जोरावर भारताने जपानवर ४-३ असा विजय मिळवला. भारताचा गोलकीपर आणि कर्णधार पीआर श्रीजेशच्या अनुपस्थितीतही भारताने हा जबदस्त विजय मिळवला. श्रीजेशला गेल्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तो पूर्ण स्पर्धेतूनच बाहेर गेला आहे.
या विजयाबरोबर इपोह, मलेशिया येथे सुरु असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी कपमध्ये भारताच्या अंतिम सामन्यात जाण्याचा आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या आक्रमण फलित खेळात असलेल्या मनदीप सिंगच्या हॅट्रिक गोलच्या जोरावर भारताने जपान विरुद्ध अशक्य असणारा विजय शक्य करून दाखवला आहे.

भारताच्या बचाव फळीत खेळणाऱ्या रुपिंदर पाल सिंगने सहाव्या मिनिटाला गोल करून भारताचे गोलचे खाते उघडले. मिळालेला  पेनल्टी कॉर्नर त्याने सार्थकी लावली. सामन्याच्या १०व्या मिनिटाला काझुमा मुरता याने गोल करून तर हैता योशिहिराने ४३व्या मिनिटाला गोल करून जपानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २ मिनिटानंतर जपानच्या गेंकी मितानीने जपानडून तिसरा गोल केला. त्यामुळे जपानकडे ३-१ अशी आघाडी झाली. भारताच्या मनदीप सिंगने ४५व्या, ५१व्या आणि ५८व्या मिनिटाला त्यात आणखी तीन गोलची भर  घालत ४-३ असा विजय साकार केला .

सुलतान अझलन शाह हॉकी कप २०१७ मध्ये गोलची हॅट्रिक करणारा मनदीप सिंग हा जगातील तिसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला.

 

ठळक:

या सामन्यातील गोल:
६व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंग
१०व्या मिनिटाला काझुमा मुरता
४३व्या मिनिटाला हैता योशिहिरा
४५व्या मिनिटाला गेंकी मितानी
४५व्या मिनिटाला मनदीप सिंग
५१व्या मिनिटाला मनदीप सिंग
५८व्या मिनिटाला मनदीप सिंग

 

भारताचा पसुलतान अझलन शाह हॉकी कप २०१७ मधील प्रवास
२-२ अनिर्णित विरुद्ध इंग्लंड
३-० विजय विरुद्ध न्यूजीलँड
१-३ पराभव विरुद्ध ऑस्टेलिया
४-३ विजय विरुद्ध जपान

भारताचे चार सामन्यात ७ गुण झाले आहेत.