केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचा दुस-या फेरीत प्रवेश

पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल याने ऑस्ट्रियाच्या लुकास मीएडलरचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीचा हा सामना आज दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पार पडला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत सुमितने ७-६, ६-० असा दोन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. पहिला सेट ७-६ असा चुरशीचा झाल्यावर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सुमितने लुकासला कोणतीही संधी न देता ६-० असा सेट जिंकत सामना जिंकला.

पुरुष एकेरीमध्ये साकेत मायनेनी आणि एन श्रीराम बालाजी पाठोपाठ दुसऱ्या फेरीत प्रवेश करणारा सुमित तिसरा भारतीय खेळाडू ठरला. काल साकेत मायनेनी आणि एन श्रीराम बालाजी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत दुसरी फेरी गाठली होती.