Tata Open: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागल यांचे आव्हान संपुष्टात

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागल याला पराभवाचा सामना पत्करावा लागल्यामुळे त्याचे या स्पर्धेच्या एकेरी गटांतील आव्हान संपुष्टात आले आहे.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 230 असलेल्या बेलारूसच्या इल्या इव्हाश्का याने जागतिक क्रमवारीत 223 असलेल्या भारताच्या सुमित नागलचा 6-3, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. हा सामना 1तास 20मिनिटे चालला.

दुहेरीत पहिल्या फेरीत स्वीडनच्या रॉबर्ट लिंडास्टेडने क्रोएशियाच्या फ्रँको स्कुगरच्या साथीत हंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स व कझाकस्तानच्या मिकेल कुकुश्किन या जोडीचा 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:
इल्या इव्हाश्का(बेलारूस)वि.वि.सुमित नागल(भारत)6-3, 6-3;

दुहेरी: पहिली फेरी:
रॉबर्ट लिंडास्टेड(स्वीडन)/फ्रँको स्कुगर(क्रोएशिया)वि.वि.मार्टन फॉक्सोविक्स(हंगेरी)/ मिकेल कुकुश्किन(कझाकस्तान)6-4, 6-1;
रोमन जेबाव्ही(प्रजासत्ताक)/ जेरी व्हेस्ली(प्रजासत्ताक) वि.वि.टेनी सॅन्डग्रेन(यूएसए)/राडू अल्बोट 6-4,  6-3;
पिएरे ह्युजूस हर्बर्ट(फ्रांस)/गिल्स सिमॉन(फ्रांस)वि.वि.केविन अँड्रेसन(दक्षिण अफ्रिका)/जोनाथन एलरीच(इस्राईल)3-6, 6-3, 10-5