पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराला 2 मे पासून सुरुवात होणार असून हे शिबीर 31 मे पर्यंत असणार आहे. तसेच, हे शिबीर सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत दोन बॅचमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी दिली.

शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी पीवायसी हिंदू जिमखाना कार्यालयाशी 020 67602000/01 अथवा 020 67602060 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.