ट्रान्सफर विंडो: इंग्लिश प्रिमीयर लीग आणि ला लीगामध्ये खेळणारे पहिले पाच संभाव्य खेळाडू

फिफा विश्वचषक संपल्यावर आता इंग्लिश प्रिमीयर लीग(इपीएल) आणि ला लीगामध्ये क्लबमधील खेळाडूंच्या ट्रान्सफर विंडोला सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षीच्या उन्हाळ्यातील ट्रान्सफर विंडो 17 मे ला सुरू झाली.

इपीएलमध्ये चेल्सी आणि मॅंचेस्टर युनायटेड हे दोन क्लब जास्त सक्रिय आहेत. कमीतकमी या दोन क्लब्सना दोन तरी नवीन खेळाडू संघात घ्यायचे आहेत.

युनायटेडचे प्रशिक्षक जोस मौरीन्हो यांना संघाच्या कामगिरीबद्दल चिंता वाटत असून त्यांना नवीन खेळाडूंची आवश्यकता आहे. आता ते कोणाला संघात घेणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

तसेच या आठवड्यातील ट्रान्सफर विंडोमधील काही पहिले पाच फुटबॉलपटू-

1) विलीयन (चेल्सी ते रियल माद्रिद)- ब्राझिलच्या या फुटबॉलपटूला सराव सामन्यात पासपोर्टमुळे सहभागी होता आले नाही. तसेच त्याला घेण्यात रियल आणि युनायटेडने रूची दाखवली होती पण चेल्सीनेच त्याला संघात कायम ठेवले. यावेळी युनायटेडने 75 मिलियन युरोची बोली लावली होती. विलीयनने मागील वर्षी चेल्सीकडून खेळताना प्रिमीयर लीगमध्ये 6 गोल केले होते.

Photo Courtesy: Twitter/ ChelseaFC

2) हॅरी मॅगुइर (लेसेस्टर सिटी ते मॅंचेस्टर युनायटेड)- इंग्लंडच्या या फुटबॉलपटूला घेण्यात युनायटेडचे प्रशिक्षक जोस मौरीन्हो यांची खूप इच्छा आहे पण लेसेस्टर सिटीला त्यांचा हा खेळाडू गमवायचा नाही.

तसेच युनायटेडने लिलावात त्याच्यासाठी तगडी बोली लावली आहे. या 25 वर्षीय मॅगुइर बरोबर सिटीने त्यांच्या नवीन किटचे फोटोज हे ट्विटरवर टाकले असून यामधून असे दिसून येते की होते की त्यांना हा खेळाडू कायम ठेवायचा आहे.

3) ओस्मानी डेम्बेले (बार्सेलोना ते अर्सेनल)- अर्सेनल क्लबला ओस्मानी डेम्बेले या फ्रेंच फुटबॉलपटूला घेण्यात आधीपासूनच जास्तच रस आहे. मागील हंगामात डेम्बेले याला क्लबमध्ये घेण्यात अर्सेनल अपयशी ठरला.

150 मिलियन युरोमध्ये त्याला बार्सेलोनाने लिलावात घेतले होते. पण त्या पुर्ण हंगामात डेम्बेले राखीव खेळाडूंमध्ये बसून होता. म्हणून त्याला संघातून बाहेर पडण्याची इच्छा आहे. अर्सेनलचे प्रशिक्षक युनिई एमरी हे डेम्बेले बरोबरच अरोन रॅम्से याचा ही विचार करत होते. पण एमरी यांनी रॅम्सेलाच संंघात कायम ठेवले आहे.

4) गोन्झालो हिग्नेइन (जुवेंट्स ते ए सी मिलॅन)- जुवेंट्सच्या या स्ट्रायकरने 18 मिलियन युरोमध्ये ए सी मिलॅन क्लबमध्ये सामील होण्यास होकार दिला असून मुळ किंमतीत म्हणजेच 36 मिलियन युरोमध्ये त्याला कायम करण्याची दाट शक्यता आहे.

अर्जेंटिनाच्या या 30 वर्षीय फुटबॉलपटूचे स्थान क्रिस्तियानो रोनाल्डो संघात आल्यापासूनच धोक्यात होते. तसेच त्याचा एंजट आज ए सी मिलॅन आणि जुवेंट्स या संघाना भेटला.

5) येर्रे मिना (बार्सेलोना ते मॅंचेस्टर युनायटेड)- मागील हंगामातच बार्सेलोना क्लबमध्ये आलेल्या येर्रे मिना याला बाहेर पडण्याची घाई झाली आहे. कोलंबियन डिफेंडर मिनाला युनायटेड लिलावात घेऊ शकतो. तसेच काही स्पॅनिश रिपोर्टनुसार युनायटेड क्लबमध्ये त्याची जागा निश्चित झाली आहे.

या सगळ्या खेळांडूचे स्थान लवकरच पक्के होणार आहे कारण ही इंग्लिश ट्रान्सफर विंडो 9 ऑगस्ट पर्यंतच सुरु रहाणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅलिसन बेकरचे गोलकिपींगचे कौशल्य पाहुन सलाह झाला अाश्चर्यचकित

व्हिडिओ: मेस्सीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं