असा बाद होणारा तो जगातील पहिलाच खेळाडू !

कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर हिट विकेट बाद होणारा सुनील अम्बरीस हा पहिलाच खेळाडू बनला आहे. तो गोल्डन डक अर्थात एकही धाव न करता बाद झाला आहे.

आज विंडीज विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील पहिला कसोटी सामना येथील वेलिंग्टन येथे सुरु झाला. यावेळी न्यूझीलँडचा कर्णधार केन विलियम्सन ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आजच्या सामन्यात न्यूझीलँड कडून टॉम ब्लुन्डेल तर विंडीजकडून सुनील अम्बरीस यांनी कसोटी पदार्पण केले. १ वनडे सामना खेळलेल्या सुनील अम्बरीससाठी हे पदार्पण नक्कीच कायम स्मरणात राहणारे ठरले. कारण जेव्हा तो ३०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिट विकेट झाला तेव्हा त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही जमा झाला.

या चेंडूचा सामना करताना त्याचा पाय स्टंपला लागला आणि बेल्स खाली पडल्या. यामुळे त्याला बाद देण्यात आले.

कसोटी पदार्पणात ० धावा अर्थात गोल्डन डकवर हिट विकेट होणारा तो पहिला फलंदाज ठरला. २००३ नंतर पदार्पणात हिट विकेट ठरणारा तो पहिला खेळाडूही ठरला.

आजपर्यंत ११ खेळाडू कसोटी पदार्पणात हिट विकेट ठरले आहेत. तर ६३ खेळाडू हे पदार्पणातच गोल्डन डकवर बाद होणारा तो ६३वा खेळाडू ठरला.

गोल्डन डक म्हणजे काय?
एखादा खेळाडू जेव्हा तो खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर बाद होतो त्याला गोल्डन डक असे म्हटले जाते.

हिट विकेट म्हणजे काय?
जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाज त्याला सामोरा जातो त्यावेळी त्याच्याकडून स्टंपवरील बेल्स बॅट किंवा शरीराचा अन्य भाग किंवा कपडे/ हेल्मेट या वस्तू लागल्यामुळे पडते तेव्हा फलंदाजाला बाद दिले जाते.