सुनील छेत्रीने मोडला वेन रुनीचा रेकॉर्ड

भारतीय फुटबॉल संघ सध्या रोज यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. नुकत्याच झालेल्या किर्गिज़स्तान सोबतच्या सामन्यात भारताने १-० जिंकत एशिया कपच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या जवळ गेली आहे. भारताबरोबच कर्णधार सुनील छेत्री देखील सध्या जबदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतासाठी कायमच छेत्री महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.

सुनील छत्रीने किर्गिज़स्तान विरुद्ध केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर भारताने सामना जिंकला. पण त्या विजयासोबतच छेत्रीसाठी एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्रीने ४ थ्या स्थानी झेप घेतली. विशेष म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, वेन रूनी, क्लिंट डिम्पसे अशी भारदस्त नाव असणाऱ्या यादीत आता एक भारतीय जेव्हा या यादीत स्थान मिळवतो ही एक मोठी गोष्ट आहे.

यापूर्वी देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या आणि सध्या खेळत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो (७३ गोल ), लिओनेल मेस्सी (५८ गोल), क्लिंट डिम्पसे ( ५६ गोल ) हे दिग्गज खेळाडू आहेत.

या सामन्यापूर्वी रुनी आणि छेत्री यांचे सारखेच गोल होते. परंतु या सामन्यात विजयी गोल करून छेत्रीने सध्या खेळत असलेल्या खेळाडूंच्या यादीत ४था क्रमांक मिळवला.

देशासाठी सर्वाधीक गोल करणारे आणि सध्या खेळत असलेले खेळाडू

१. क्रिस्तियानो रोनाल्डो – ७३ गोल

२. लिओनेल मेस्सी – ५८ गोल

३. क्लिंट डिम्पसे – ५६ गोल

४. सुनील छेत्री – ५४ गोल

५. वेन रूनी – ५३ गोल