सुनील छेत्रीचा भारतीय फुटबाॅल संघासाठी मास्टर प्लॅन तयार!

इंटरकाँटिनेंटल चषकाचे विजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार सुनिल छेत्रीने भारतीय फुटबॉल संघासाठी एक नविन ध्येय समोर ठेवले आहे.

फिफा विशवचषक फुटबॉल स्पर्धेत ऑफिसिअल बॉल मॅच कॅरिअरचे प्रायोजक असलेल्या किया मोटर्सने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सुनिल छेत्री बोलत होता.

तो म्हणाला “आपण आता जास्तीत जास्त सामने खेळले पाहिजेत. येत्या काळात भारतीय संघाने आशिया खंडातील फुटबॉल क्रमवारीत पहिल्या दहा संघात  स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्यासाठी आपण आपल्यापेक्षा बलाढ्य संघांबरोबर सामने खेऴले पाहिजेत. आशियामध्ये सौदी अरेबीया आणि इराणसारखे बलाढ्य देश आहेत. त्यांच्याशी लढणं अवघड असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.”

तसेच सध्या खेळत असलेल्या आंतराष्ट्रीय फुटबॉलपटूंमधे सर्वाधिक गोल करणाऱ्यांचा यादीत नुकताच सुनिल दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने 101 सामन्यात 64 गोल करत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीची बरोबरी केली. मेस्सीने 124 सामन्यात 64 गोल केले आहेत. तर पोर्तूगालचा ख्रितियानो रोनाल्डो 150 सामन्यात 81 गोलसह अव्वल स्थानी आहे.

या विक्रमाबद्दल बोलताना सुनिल म्हणाला “मी सोशल नेटवर्कवर पाहीले की माझी मेस्सी बरोबर तुलना केली जात आहे. पण ते योग्य नाही. मेस्सी जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. माझी त्याच्याशी केव्हाच तुलना होउ शकत नाही.”

महत्वाच्या बातम्या:

रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री

भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!

फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे नक्की काय रे भाऊ?

मेस्सीच्या कोलकात्यामधील चाहत्याने घरालाच दिला अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग