धोनी आणि धवनने ही गोष्ट करायलाच हवी, गावसकरांनी ठणकावले

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरने भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनी आणि शिखर धवन बाबत बीसीसीआयच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

धोनी आणि धवन हे आगामी आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत संघात नसल्याने त्यांच्याकडे बराच रिकामा वेळ आहे. हा वेळ ते कुटुंबासोबत घालवत आहे.

गावसकरांच्या मते, इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी सहाच महिने बाकी आहेत. तर यासाठी धोनी आणि धवन या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे आणि सराव सुरू ठेवावा.

धोनीला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमधून 2014मध्ये निवृत्ती घेतल्याने आणि भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 6 डिसेंबर 2018 ते 7 जानेवारी 2019 या दरम्यान सुरू असल्याने त्याच्याकडे पूर्ण डिसेंबर महिना बाकी आहे.

तसेच धवनही भारतीय कसोटी संघात नाही. तो ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका खेळल्यानंतर विश्रांतीच घेत आहे.

धोनी आणि धवन हे त्यांचा वेळ वाया घालवत असून त्यांना विचारावे ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये का खेळत नाही. तसेच बीसीसीआयनेही विश्रांती करत असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना  देशांतर्गत सामने खेळण्याची समंती द्यावी, असे मत गावसकरानी मांडले आहे.

धोनीने त्याचा शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला खेळला होता. तसेच तो डिसेंबरमध्येही खेळत नसल्याने त्याच्याकडे बराच वेळ आहे. तसेच त्याला आगामी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत संघात संधी मिळल्यास चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलियन भूमीत या संघाने आॅस्ट्रेलिया विरुद्ध मिळवले आहेत सर्वाधिक कसोटी विजय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीला हा खास विक्रम करण्याची संधी

डुबकी किंग परदीप नरवालला प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी