कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूने केले होते मराठी चित्रपटात काम

भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर आज 70 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. भारताकडून खेळताना तब्बल 16 वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या गावसकरांनी मराठी चित्रपटातही काम केले आहे.

1980 साली गावसकरांनी क्रिकेटमध्ये सक्रिय असताना ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात काम केले होते. तसेच त्यांनी ‘झकोळ’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

आपल्या क्रिकेटच्या कौशल्यांबरोबरच त्यांना अभिनय आणि गायनातही पारंगत होते. सुनिल गावसकरांनी ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला’ हे गाणेही गायले होते.

सुनिल गावसकर यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवले होते. आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकट रसिकांना तृप्त करणाऱ्या सुनिल गावसकरांनी अभिनय आणि गायनानेही आपल्या चाहत्यांना तृप्त केले आहे.

1988 साली नसरुद्दीन शहा प्रमुख भुमिकेत असलेल्या ‘मालामाल’ या चित्रपटातही सुनिल गावसकर यांनी काम केले आहे.

सुनिल गावसकरांची क्रिकेट कारकिर्द-

सुनिल गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1917 साली पदार्पण केले होते. त्यांनी 125 कसोटी सामन्यात 10,122 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 34 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.

तर 108 एकदिवसीय सामन्यात 3092 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्य 34 शतके करणाऱ्या गावसकरांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र एकच शतक करता आले आहे. तसेच यामध्ये 27 अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहली करतोय जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे अनुकरण, पहा व्हिडिओ

…म्हणून ट्विटरवरुन होत आहे भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीका

भारताविरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबरच कर्णधार विलियम्सनने केली एका विश्वविक्रमाची बरोबरी