या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल

भारतीय संघ सध्या एशिया कप 2018 स्पर्धेत खेळत असून 19 सप्टेंबरला त्यांचा सामना पाकिस्तान विरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताने 126 चेंडू बाकी ठेवत 8 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी समालोचन करणारे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांनी पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फकार जामन आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर टीका केली आहे.

त्यांनी या सामन्यातील गोलंदाजीदरम्यान फकारने ‘रॅपर’ स्टाईल संघाची टोपी घातल्याने आणि दिनेशने त्याच्या जर्सीवर डिके(DK) असे टोपननाव लिहील्याने ही टीका केली आहे.

फकारने भारतीय संघ फलंदाजी करत असताना 18 व्या षटकात उलटी टोपी घातली होती. ते पाहुन गावस्कर म्हणाले, “कोणीतरी, कदाचीत कर्णधाराने त्याला सांगा की ती राष्ट्रीय संघाची टोपी आहे. ती नीटच घातली पाहिजे. तूम्ही पीएसएल(पाकिस्तान सुपर लीग) मध्ये असे करु शकता पण राष्ट्रीय संघात नाही.”

तसेच त्यानंतर ते या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कार्तिकबद्दल म्हणाले, ‘कदाचीत ते त्याचे टोपननाव असेल. पण जर त्याच्या जर्सीवर त्याचा क्रमांक आहे, तेव्हा लोक त्याला त्यावरुन ओळखतात. पण जर्सीवर नाव लिहीने गरजेचे आहे.

तसेच तूम्हाला जर टोपननाव लिहायचे असेल तर तूम्ही तूमचे नाव लिहुन त्यापुढे टोपननाव लिहा.

एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सुपर फोरमधील सामना रविवारी, 23 सप्टेंबरला पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव

एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर

एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप?