सुनील गावस्करांची इंग्लंडच्या माजी कर्णधारावर जोरदार टीका

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना साउथॅंप्टनमधील  द रोज बॉल मैदानावर सुरु आहे.

या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक 39 चेंडूत 12 धावांवर असताना बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने केएल राहुलकडे झेल द्यायला भाग पाडले. कूक ड्राइव्ह फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

कूकला या मालिकेत आत्तापर्यंत एकदाही 40 धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. त्याने या मालिकेत 7 डावात फलंदाजी करताना त्याने 15.57 च्या सरासरीने केवळ 109 धावा केल्या आहेत. ही मालिका कूकसाठी आतापर्यंत तर खूपच खराब ठरली आहे.

चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत असताना आणि हवेतही काही हालचाली असताना कूकने ते चेंडू सोडने अपेक्षित होते. त्यामुळे गावस्करांनी कूकवर टीका केली आहे.

ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, “तो क्वचितच त्याचे पाय हालवतो. तसेच तिसऱ्यांदा राहुलने त्याचा झेल घेतला आहे. जेव्हा कमी धावा झालेल्या असताना तेव्हाच कूक पुन्हा अपयशी ठरला आहे.”

याबरोबरच या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान कारकिर्दीत एक नको असलेला विक्रमही कूकच्या नावावर झाला आहे. गेल्या 8 वर्षांत प्रथमच या क्रिकेटपटूची कसोटीतील सरासरी 45च्या खाली गेली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात निवड झालेल्या 20 वर्षीय क्रिकेटपटूने मानले राहुल द्रविडचे आभार

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक

एशियन गेम्स: भारताला ब्रिज प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक