लिटिल मास्टर गावसकरांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे मंगळवारी, 10 जुलैला त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. गावसकर त्याच्या निडर फलंदाजीसाठी ओळखले जातात.

कसोटीत 10,000 धावा करणारे पहिलेच क्रिकेटपटू ठरलेल्या गावस्करांच्या बाबतीत एकदा एक विचित्र किस्सा घडला होता. त्यांचे केस एकदा चक्क चालू सामन्यात मैदानावरील पंचांनीच कापले होते.

झाले असे की 1974 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात गावस्कर फलंदाजी करत होते. त्यावेळी त्यांचे केस सारखे डोळ्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तेव्हा त्यांनी मैदानावरील पंच डिकी बर्ड यांना त्यांचे केस केपण्याची विनंती केली. यासाठी बर्ड यांनी तयारी दाखवली. त्यांनी त्यांच्याकडे चेंडूच्या शिवणीचे धागे कापण्यासाठी असणाऱ्या कात्रीने गावस्करांचे केस कापले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूने केले होते मराठी चित्रपटात काम

विराट कोहली करतोय जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे अनुकरण, पहा व्हिडिओ

…म्हणून ट्विटरवरुन होत आहे भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीका