श्रेयस अय्यरबद्दल सुनील गावस्करांनी केले मोठे भाष्य

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांनी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यायला हवी असे म्हटले आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला एमएस धोनीप्रमाणे 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला पाहिजे असे देखील म्हटले आहे.

रविवारी(11 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयसने भारताकडून पंत बाद झाल्यानंतर 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 5 चौकार आणि 1 षटकारासह 68 चेंडूत 71 धावांची अर्धशतकी खेळी केली.

याबरोबर कर्णधार विराट कोहलीसह श्रेयसने चौथ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारीही केली आणि भारताने या सामन्यात मिळवलेल्या 59 धावांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर सोमवारी गावस्करांनी म्हटले की ‘जर भारताला विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली आणि त्यांनी 40-45 षटकापर्यंत फलंदाजी केली तर पंत चौथ्या क्रमांकावर ठिक आहे. पण जेव्हा 30-35 षटके फलंदाजी करण्याचा प्रश्न असतो तेव्हा श्रेयस अय्यरने चौथ्या आणि पंतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी.’

याबरोबरच गावस्करांनी श्रेयसने विंडीज विरुद्ध केलेल्या अर्धशतकी खेळीचे कौतुक करताना त्याने संघात संधी मिळाल्याचा चांगला फायदा घेतला असल्याचे म्हटले आहे.

24 वर्षीय श्रेयसचे वनडे क्रिकेटमधील हे तिसरे अर्धशतक होते. त्याला आत्तापर्यंत 8 वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. यातील 6 डावात त्याने फलंदाजी केली आहे. 6 डावात फलंदाजी करताना त्याने तीन अर्धशतके केली आहेत.

त्याची ही कामगिरी पाहता आता त्याला भारतीय संघात मधल्या फळीत नियमीत संधी दिली पाहिजे. तसेच तो संघात बराच काळ टिकेल, असे गावस्करांनी म्हटले आहे.

रविवारचा सामना भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी जिंकला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट वनडेत करणार ‘एवढी’ शतके, भारताच्या माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश; आयसीसीने केली मोठी घोषणा

…तर टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान येणार धोक्यात