सुनील नारायणने केले आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक…

बेंगलोर विरुद्ध खेळताना केकेआरच्या सुनील नारायणने १५ चेंडूत अर्धशतक करत नवा विक्रम केला. यापूर्वी केकेआरच्याच युसूफ पठाणने हैद्राबाद संघाविरुद्ध २०१४ मध्ये खेळताना १५ चेंडूंत अर्धशतक केले होते. नारायणने या वेगवान अर्धशतकाबरोबर युसूफ पठाणच्या आयपीएलमधील विक्रमाची बरोबरी केली.

 

या विक्रमाबरोबरच केकेआरने पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. त्यांनी पॉवर प्ले १०५ धावा करून चेन्नईचा १०० धावांचा विक्रमही मोडला.

 

तसेच नारायण आणि लिन यांनी आयपीएलमधील वेगवान शतकी भागीदारीची बरोबरी करताना ३६ चेंडूत तब्बल १०० धावाही आज केल्या. यापूर्वी हा विक्रम मुंबईच्या हरभजन सिंग आणि सूचित यांच्या नावावर होता.

 

आयपीएल मधील वेगवान अर्धशतके

१५ चेंडू, सुनील नारायण २०१७ विरुद्ध बेंगलोर
१५ चेंडू, युसूफ पठाण, २०१४ विरुद्ध हैद्राबाद
१६ चेंडू, सुरेश रैना, २०१४ विरुद्ध पंजाब