हा आहे बॉलीवूड स्टार सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू?

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने आपला आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तिचा आवडता क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आहे.

सनीने तिच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर प्रशनोत्तरांचा एक खास सेशन ठेवला होता. त्यात एका चाहत्याने तिला तिचा आवडता संघ आणि आणि खेळाडू कोण असे विचारले. यावेळी तिने क्षणाचाही विचार न करता संघ भारत तर खेळाडू एमएस धोनी असल्याचे म्हटले आहे.

धोनी भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटीत जवळ जवळ १८ महिने अव्वल होता. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११चा विश्वचषक, २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०१३ ला चॅम्पिअनस ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

त्याचबरोबरीने धोनी एक उत्तम यष्टीरक्षक आहे. त्याने नुकतेच यष्टिरक्षणात आपले ७५० बळी पूर्ण केले. त्यात त्याने १०० पेक्षा जास्त स्टम्पिंग करत आत्तापर्यंत सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम केला आहे.

धोनी सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या टी२० मालिकेत व्यस्त आहे.