आयपीएल लिलाव: ९ कोटी देऊन हैद्राबाद संघाने केले या खेळाडूला आरटीएम कार्ड वापरून कायम

बंगलोरमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलाव जसा जसा पुढे जात आहे तशी फ्रॅन्चायझींमध्ये चुरस बघायला मिळत आहे. या लिलावात अनेक आश्चर्याचे निर्णयही पाहायला मिळाले आहेत. लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, ख्रिस गेल यांसारखे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत, म्हणजेच कोणत्याच संघाने त्यांना संघात घेतले नाही.

असे असतानाच अफगाणिस्थानचा खेळाडू रशीद खानला ९ कोटी देऊन सनरायझर्स हैद्राबादने राईट टू मॅच (आरटीएम) कार्डचा वापर करून कायम केले आहे. रशीदवर किंग्स इलेव्हन पंजाबने ९ कोटीची बोली लावली होती, परंतु हैद्राबादकडे आरटीएम कार्ड उपलब्ध असल्याने त्यांनी त्याचा वापर केला.

रशीद खान चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच तो सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने विंडीज विरुद्ध ८. ४ षटकात १८ धावा देत ७ बळी घेतले होते.

किंग्स इलेव्हन पंजाबने याआधी ११ कोटी देऊन केएल राहुलला संघात घेतले आहे.  तर हैद्राबादने मनीष पांडेसाठी ११ कोटीची बोली लावली होती.