इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक आता आयपीएलच्या या संघाला करणार मार्गदर्शन

आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबाद संघाने ट्रेवर बेलिस यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. याबद्दल आज सनरायझर्स हैद्राबादने घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नुकताच 2019 विश्वचषकविजेत्या इंग्लंड संघाचे बायलिस प्रशिक्षक आहेत.बेलिस हे सनरायझर्स हैद्राबाद संघात आता टॉम मुडी यांची जागा घेणार आहेत. मुडी हे हैद्राबादचे 2013 पासून मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबादने 2016 ला आयपीएलचे विजेतेपदही मिळवले आहे.

सनरायझर्स हैद्राबादच्या प्रशिक्षकपदी नव्याने नियुक्त करण्यात आलेले बेलिस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की ते ऍशेस मालिकेनंतर इंग्लंडचे प्रशिक्षकपद सोडणार आहेत. त्याचबरोबर बेलिस यांनी 2012 ला कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाचा नाईट रायडर्सने आयपीएलची 2 विजेतीपदे मिळवली आहेत

तसेच बेलिय यांच्या प्रशिक्षणाखाली सिडनी सिक्सर्स संघाने बीग बॅश लीग आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचबरोबर आणखी एक विशेष म्हणजे 2011 च्या विश्वचषकावेळी बेलिस हे श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. या विश्वचषकात श्रीलंका उपविजेते ठरले होते.

सनरायझर्स हैद्राबादने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘सनरायझर्स फ्रँचायझीने खूप विचार केल्यानंतर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमीकेला वेगळी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. टॉम मुडी यांच्या सेवेपासून आता वेगळा मार्ग करण्याचा निर्णय झाला आहे.’

तसेच पुढे म्हटले आहे की इंग्लंडला 2019 विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांना सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. ट्रेवर यांनी केकेआरबरोबर आधीच दोन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच सिडनी सिक्सरबरोबर बीग बॅश लीग आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.’

‘त्यांनी स्वत:ला यशस्वी म्हणून सिद्ध केले आहे. आम्हाला वाटते त्यांच्या यशाचा रेकॉर्ड सनरायझर्स हैद्राबादला पुढे घेऊन जाण्यात योग्य असेल.’

‘आम्ही टॉम मुडी यांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने मागील 7 वर्षात 5 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यात 2016 ला मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदाचाही समावेश आहे. आम्ही त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना यश मिळो, अशा शुभेच्छा देतो.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी असे केले केन विलियम्सनचे कौतुक

विश्वचषकातील इंग्लंडच्या या स्टार खेळाडूला आता कसोटी पदार्पणाचीही संधी

अंतिम सामन्यानंतर सचिन तेंडुलकर केन विलियम्सनला असे म्हणाला…