सुपर 7 स्लॅम हौशी टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन

पुणे | टेनिस नट्स आणि गेम ऑन इव्हेंट्स तर्फे सुपर 7 स्लॅम हौशी टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मगरपट्टा टेनिस कोर्ट येथे 29 व 30 डिसेंबर रोजी होणार आहे.
स्पर्धेत शहरांतून 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून ही स्पर्धा एकेरी व दुहेरी गटांत पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व करंडक पारितोषिक देण्यात येणार आहे.