एशिया कपमध्ये पहिल्यांदाच ‘सुपर ओव्हरचा’ समावेश

एशिया कप 2018 या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पहिला सामना झाला. त्यात बांग्लादेशाने बाजी मारली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी सुपर ओव्हर लागू केली आहे. म्हणजे सामना अनिर्णित अवस्थेत राहीला तरी विजेतेपद विभागून देण्याची वेळ येणार नाही.

आशिया खंडातील 6 संघ आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत पहील्यांदा सुपर ओव्हर ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याने चुरसीचे सामने होण्याची अपेक्षा आहे.

सामन्यात धावसंख्या समान झाल्यास ही पध्दती अवलंबण्यात येणार आहे. सुरूवातीला टी-20 सामन्यांसाठी ही पध्दत होती मात्र आयसीसीने याचा विस्तार वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

सुपर ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 2 विकेट प्रत्येक संघाला मिळतील. सुपर ओव्हर मधील धावा रेकॉर्ड म्हणून  गृहीत धरल्या जाणार नाहीत.

एशिया कपमध्ये 6 संघ असतील जे दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. श्रीलंका,  बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे ‘ब’ गटात तर  गट ‘अ’ मध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या बरोबरीने भारत असणार आहे.

19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात उत्कंठावर्धक सामना होण्याची अपेक्षा आहे. गतविजेता भारत एशिया कप आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे भारताचे प्रभारी कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आहे. तसेच उपकर्णधारपदी शिखर धवनची निवड करण्यात आली आहे.

एशिया कप स्पर्धेतील संघ आणि खेळाडू:

असा आहे भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिकहार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल.

असा आहे पाकिस्तानचा संघ-

सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शान मसूद, शोएब मलिक, हरीस सोहेल, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान खान, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.

असा आहे हाँग काँगचा संघ- 

अंशुमन रथ (कर्णधार), आयझ खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकअल्सन, क्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाज, अरशद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, निजाकत खान, राघ कपूर, स्कॉट मॅकेकनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, आफताब हुसेन.

असा आहे श्रीलंकेचा संघ-

अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, कुसल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दानुश्का गुनथिलका, थिसरा परेरा, दसुन शनका, धनंजय डि सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवन परेरा, अमिला अपोन्सो, कसून रजीथा, सुरंगा सकमल, दुश्मंथा चमिरा, लसिथ मलिंगा.

असा आहे बांगलादेशचा संघ-

मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार)शाकिब अल हसन, तमीम इक्बालमोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकुर रहिम, अरिफुल हक, महमदुल्ला, मोसद्दीक हुसेन, मेहदी हसन, नाझमुल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान, अबू हैदर रोनी, नाझमुल हुसेन शान्तो, मोमिनुल हक.

असा आहे अफगाणिस्तानचा संघ-

असघर अफगाण (कर्णधार), मोहम्मद शहझाद, इहसानुल्लाह जनत, जावेद अहमदी, रेहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बादिन नायाब, रशीद खान, नजीबुल्लाह झादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, सामीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद शिरझाद, शारफुद्दीन अशरफ, यमीन अहमदझाई.