सुपर स्मॅशर्स संघाला पिकलबॉल सुपर कपचे जेतेपद

मुंबई, नोव्हेंबर 19: सुपर स्मॅशर्स संघाने एकता परिवार संघाला 8-7 अशा फरकाने नमवित डीसीबी बँक पुरस्कृत एकता वर्ल्ड पिकलबॉल सुपर कप स्पर्धेचे जेतेपद मिळवले.खार जिमखाना येथे झालेल्या पाच सामन्यांचा समावेश असलेल्या अंतिम सामन्यात स्मॅशर्स संघाने पुरुष व मिश्र दुहेरी सामने जिंकत 4-2 अशी आघाडी घेतली. पण, एकता संघाने पुनरागमन करत स्मॅशर्स संघाला आव्हान दिले.

तेजस महाजनने एकता संघाकडून चमक दाखवत राष्ट्रीय चॅम्पियन कुलदीपला 2-1 (8-11, 11-9, 11-7) असे नमविले. पहिला गेम गमावून देखील तेजसने पुनरागमन करत विजय मिळवला. भारतीय खेळाडू मनिष राव व सौमित्र कोरगावकर यांनी पुरुष दुहेरीत भुषण पोतनिस आणि अंकुर कपाडिया जोडीला 2-1 (11-10, 11-4, 9-11) असे नमविले. या सामन्यात भुषण व अंकुर यांनी मनिष- सौमित्र या जोडीला आव्हान दिले. पण, स्मॅशर्सने विजय मिळवत सामना 6-6 असा बरोबरीत राहीला.

निर्णायक मिश्र दुहेरीत चांगलीच चुरस ही पहायला मिळाली.बिद्युत चौधरी व माधुरी विस्पुते जोडीने तेजस महाजन व शितल पाटील जोडीवर विजय मिळवत चमक दाखवली. पहिला 11-10 असा जिंकल्यानंतर तेजस-शितल जोडीने पुढच्या गेममध्ये पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला.निर्णायक तिस-या गेममध्ये स्मॅशर्सकडे 10-9 अशी आघाडी होती व फायनल पॉईंट जिंकत त्याने सामन्यासह जेतेपद देखील मिळवले.

विजेत्या संघात एक लाख रुपये तर, उपविजेत्या संघाला 75 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे सचिव सुनिल वालावलकर म्हणाले की, स्पर्धेच्या आयोजनामुळे आम्ही आनंदी आहोत. याचे सर्व श्रेय स्पोर्ट्सकास्टला जाते. त्यांच्यामुळेच या स्पर्धेला ग्लॅमर आले. येथून या खेळाला आणखीन प्रोत्साहन मिळेल.

– अंतिम निकाल :
सुपर स्मॅशर्स वि.वि. एकता परिवार 8-7
– पुरुष/ मुले दुहेरी : भुषण पोतनिस/ कुलदीप महाजन वि.वि. मनिष राव/ अनिकेत दुर्गावली 2-1 (11-6, 6-11, 11-5)
-मिश्र दुहेरी : अंकुर कपाडिया/वृशाली ठाकरे वि.वि. सौमित्र कोरगावकर/ सलोनी देवडा 2-1 (10-11, 11-9, 11-6)
-खुली एकेरी : कुलदीप महाजन पराभूत वि.तेजस महाजन 1-2 (11-8, 9-11, 7-11)
– पुरुष/मुले दुहेरी : भुषण पोतनिस/ अंकुर कपाडिया पराभूत वि. मनिष राव/ सौमित्र कोरगावकर 1-2 (10-11, 4-11, 11-9)
– मिश्र दुहेरी : बिद्युत चौधरी/ माधुरी विस्पुते वि.वि. तेजस महाजन/ शितल पाटील 2-1 (11-10, 8-11, 11-9)
…………………
– रोल ऑफ हॉनर
– सर्वोत्तम 25 वर्षाखालील खेळाडू : कुलदीप महाजन (स्मॅशर्स)
– सर्वोत्तम महिला खेळाडू : वृशाली ठाकरे (स्मॅशर्स)
– सर्वोत्तम पुरुष खेळाडू : मनिष राव (एकता)