सुरेश रैनाने केले या महिलेचे कौतुक

भारताने आपला ७१ वा स्वातंत्र्य दिन काल साजरा केला. भारतभर स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करणात आला. मात्र काश्मीरमधील काही भागात वातावरण थोडेसे तणावपूर्ण होते.

जम्मू काश्मीर येथे गेले अनेक दिवस तणावपूर्ण स्थती असल्यामुळे नागरिकांना आपल्या सुरक्षेसाठी काळजी घ्यावी लागत आहे. शिवाय सातत्याने चालू असलेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे तिथली स्थिती चांगलीच नाजूक झाली आहे.

या सर्वगोष्टी लक्षात घेता काल जम्मू काश्मीर येथे अनेक लोकांनी राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहण्यास प्राधान्य न देता बसून राहणे योग्य समजले. अश्याच घडामोडीत एक महिला श्रीनगरच्या लाल चौकात येऊन “भारत माता की जय आणि वंदे मातरम” अशी घोषणाबाजी करत होती. संपूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसर रिकामा होता मात्र ही एकटीच या घोषणा देत होती. तिथली परिस्थती लक्षात घेता या स्त्रीसाठी काही सुरक्षारक्षक तिच्या भोवती उभे होते. ती महिला इतर लोकांना देखील आपण सर्वजण भारताचा भाग आहोत म्हणून घोषणा देण्यास आव्हान करत होती.

या झालेल्या घटनेची दखल घेत भारताचा फलंदाज सुरेश रैना याने ट्विटरच्या माध्यमातून या स्त्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याने असेही म्हणले की अश्या या  धाडसी आणि देशभक्त स्त्रीला मी सलाम करतो.