या दुर्लक्षित खेळाडूला मिळू शकते श्रीलंका दौऱ्यात संधी !

२० ऑगस्टपासून भारताची ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका श्रीलंका संघाबरोबर सुरु होत आहे. उद्या अर्थात १३ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची या दौऱ्यासाठी घोषणा होणार असून गेली बरेच दिवस भारतीय संघापासून दूर असलेल्या सुरेश रैनाला या दौऱ्यात संधी मिळू शकते.

भारताच्या या डावखुऱ्या फलंदाजाला कमबॅक करण्याची आणखी एक संधी या रूपाने मिळू शकते. बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रैना गेले काही दिवस फिटनेस चाचणीसाठी उपस्थित होता.

” रैना हा एक मोठा खेळाडू आहे. जो भारतीय संघाला मधल्या फळीत मोठी फटकेबाजी करून जिंकून देऊ शकतो. भविष्य भारतीय संघाच व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे आम्हाला अशा खेळाडूला डावलून चालणार नाही. तो २०१९च्या विश्वचषकासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. ” असे काही अंतर्गत स्रोतांकडून टाइम्स ऑफ इंडियाला समजले आहे.

काही काळापूर्वी भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनीने त्याच्या या लाडक्या खेळाडूचा फोटो अष्टपैलू केदार जाधव बरोबर बेंगलोर येथून इन्स्ट्राग्रामवर शेअर केला होता. हे रैनाचे परतण्याचे स्पष्ट संकेत असल्याचं समजत.

ऑक्टोबर २०१५मध्ये रैना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता तर फेब्रुवारी २०१७मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना.